धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर, गुन्हा दाखल

अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: Mar 1, 2021, 11:33 AM IST
धक्कादायक!  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर, गुन्हा दाखल title=

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर केलं आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांचा (Corona Positive Patient roaming on street ) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असं असतानाही कोरोनाबाधितांचा निष्काळीजपणा उघड होत आहे. कोरोनाचे नियम सर्रासपणे टाळताना दिसत आहे. चेंबुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कोरोनाबाधित रुग्ण सर्रास घराबाहेर फिरताना आढळला.

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील एका रूग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरच्या अतुर पार्क या उच्चभ्रू परिसरात हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीला करोनाची लागण झाली होती. लागण झालेला व्यक्ती बाहेर फिरत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. संबंधिताविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली.

विनामास्क प्रवाशांवर कारवाई 

मुंबईत  कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्यानं पालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विनामास्क लोकल प्रवास करणा-या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. १ ते २७ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७ हजार ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मुंबई पु्न्हा Mission Zero 

मुंबईत पुन्हा ‘झिरो कोरोना’ मिशन सुरु झालंय. वाढत्या रुग्णांमुळे महापालिकेचे धाबे दणाणलs आहेत. पालिकेच्या आधीच्या आवाहनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचं दिसतं आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण वाढ सुरुच आहे. परिणामी मुंबईकर, आम्ही आपल्यावर नजर ठेवून आहोत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून मिशन झिरो साध्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कृपया मास्कचा वापर करा, असं आवाहन केलं. 

लग्नसमारंभामुळे धोका वाढतोय 

कल्याण पश्चिमेकडील मल्हार नगर परिसरात एका लग्न समारंभात मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली .नवरदेव आणि नवरीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. .विशेष म्हणजे हा लग्न समारंभ ज्या शाळेत आयोजित केला होता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.