मुंबई : Marathi actress Ketaki Chitale Update :वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून, आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत. तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे आज ठाणे न्यायालयात ठरणार आहे.
केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात बदनामी करणे, तेढ निर्माण करणे असे गुन्हे दाखल आहेत. केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर पोस्ट वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. त्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. केतकीने ही पोस्ट स्वत:च्या मनाने केलीय की कुणाच्या सांगण्यावरुन केलीय याची चौकशी पूर्ण न झाल्याने तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी ठाणे न्यायालयाला करण्याची शक्यता आहे. (Marathi actress Ketaki Chitale held in police custody for 'derogatory' post against Sharad Pawar)
ठाणे न्यायालयाने रविवारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. केतकी चितळे हिला फेसबुक पेजवर शेअर केल्याच्या आरोपावरुन ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली. रविवारी तिला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपावरून चितळे आणि फार्मसीचा 23 वर्षीय विद्यार्थी निखिल भामरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. चितळे यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती, तर भामरे यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी पवार यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.