मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी नवी समीकरणं जुळवण्याची शक्यता आहे.
भाजप आणि मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हं आहेत. सर्व सहमतीने अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झालीय.
अपक्ष उमेदवार उभा करून त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.
भाजपाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभा करण्यासाठी तिनही पक्षांमध्ये गुप्त चर्चा झालीय.
नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.