मुंबई : काँग्रेसची सत्ता असणाऱ्या तीन राज्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा 'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री केला. आता महाराष्ट्र राज्यात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा 'तानाजी' हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी महाराष्ट्र विकासआघाडी सरकारकडे केली आहे. त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. अजय देवगणचा 'तानाजी' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त घोषित करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, 'तानाजी' आणि 'छपाक' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दोन्ही चित्रपट १० जानेवारीला एकाचवेळी प्रदर्शित झालेत. मात्र, अजय देवगण याच्या 'तानाजी' सिनेमाने कामाईत दीपिकाच्या 'छपाक'ला मागे टाकले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये दीपिका पादुकोण हिचा 'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. तसेच ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंह वॉरियर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच १५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे ३५ कोटींच्या घरात पहिल्याच आठवड्यात कमाई गेली. २०२० मधील हा सिनेमा ब्लॉगबस्टर ठरण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे. तर दीपिकाच्या 'छपाक' ने ११ कोटींच्या घरात गल्ला जमा केला आहे.
Maharashtra: Congress leader Sachin Sawant has written to State Revenue Minister Balasaheb Thorat, requesting to declare Ajay Devgan's film Tanhaji as tax-free in Maharashtra pic.twitter.com/7GrLd96mZF
— ANI (@ANI) January 12, 2020
दरम्यान, अभिनेत्री दीपिका दिल्लीत असताना 'जेएनयू' हल्ला प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी गेली. आंदोलन ठिकाणी तिने हजेरी लावली. मात्र, तोंडातून एकही शब्द काढला नाही आणि ती दहा मिनिटांत निघून गेली. त्यानंतर दीपिका ट्रोल झाली. असे असताना आता 'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्य सरकारने तशी घोषणाच केली. त्यानंतर आता छत्तीसगडमध्येही 'छपाक' सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. आता 'तानाजी' सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे.