काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' पुढच्या आठवड्यात मुंबईत, शिवसेनाही सहभागी होणार?

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेना काय भूमिका घेणार?

Updated: Sep 28, 2022, 05:57 PM IST
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' पुढच्या आठवड्यात मुंबईत, शिवसेनाही सहभागी होणार? title=

Congress Bharat Jodo Yatra : मुंबईतही पुढील आठवड्यात भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रा यशस्वी  यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहभागी होणर आहे. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही सहभागी होणार आहेत. मुख्य म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे (Shivsena) प्रस्ताव देण्यात आला असून, लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचं समजतंय. आगामी मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Election 2022) लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान (August Kranti Maidan) ते मंत्रालयाशेजारील (Mantralay) गांधी पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहेत. 

काँग्रेसची भारत जोडो यात्रा
खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून (Congress) भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली आहे. कन्याकुमारी ते काश्मिर (kanyakumari to kashmir) असा 3 हजार 570 किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी पायी प्रवास करत आहेत.  स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वात मोठ्या राजकीय चळवळीची ही सुरुवात असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

देशातील वाढती महागाई, बरोजगारी तसंच इतर प्रश्नांवर मोदी सरकारचं लक्ष केंद्रीय करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ही यात्रा सुरुवात करण्यात आली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्ताने काँग्रेसच्यावतीने मुंबईतही या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 

भारत जोडो यात्रेच्या आयोजनबाबत मुंबई काँग्रेस कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यात्रेचं नियोजन करण्यात आलं. विविध पक्षांबरोबरच मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांनाही या यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.