मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. 

Updated: Oct 26, 2022, 07:40 AM IST
मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा  title=
CM Eknath Shinde gives signs of upcoming bmc elections

BMC Elections : एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई BMC निवडणुकांबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. BMC Elections जानेवारीत होणार असल्याचं भाकित मुख्यमंत्रांनी केलं आहे.

निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असले तरीही त्या नेमक्या कधी होतील ते फक्त देव आणि कोर्टालाच माहिती, असं वक्तव्यही देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी केलं.

निवडणूक आयोग (Election Commission) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असणाऱ्या शिंदे आणि ठाकरे गटाचा खटला अद्यापही निकाली निघालेला नाही. त्यामुळे निवडणुकांची तारीख सांगणं शक्य नसल्याचं फडणवीस माध्यमांशी संवाद साधातना म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यांमध्ये असणारी ही विसंगती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय

दरम्यान, एकिकडे या निवडणुकांचा कथित दिवस/ महिना जवळ येत असतानाच आता राज्यात आणखी एक महायुती होणार का? याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. फडणवीस (भाजप), मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या वाढत्या भेटीगाठी आणि एकंदर सलोखा पाहता डिसेंबर महिन्यात या महायुतीची मुहूर्तमेढ रोवली जाणार असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी मांडला आहे. तेव्हा आता ही महायुती खरंच आकारास येते का आणि आल्यास पालिका निवडणुकीत त्यांची काय समीकरणं असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.