ट्रान्सपोर्ट हब लवकरच - मुख्यमंत्री

वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर लवकरच वडाळ्याचा विकास करण्यात येणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 06:41 PM IST
ट्रान्सपोर्ट हब लवकरच - मुख्यमंत्री  title=

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर लवकरच वडाळ्याचा विकास करण्यात येणार आहे. 

त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हब तसंच व्यावसायिक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या बैठकीनंतर केली. भाईंदर आणि वसई विरार यांना जोडणारा ब्रीज बांधण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे अधिका-यांसोबत देखील मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी चर्चा केली. रेल्वेच्या हद्दीत असणा-या झोपड्यांना एसआरएच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्याचा आणि मूळ जागा ताब्यात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याशिवाय एमयूटीपी 3 अंतर्गत सीएसटी पनवेल जलद मार्ग, विरार गोरेगाव उन्नत रेल्वेमार्ग आणि पनवेल कर्जत अतिरिक्त लाईन हे प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासंदर्भात देखील चर्चा झाली.