मुंबई: मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर एक महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकार म्हणून आम्ही मागासवर्ग समाजाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करत आहोत. विशेष वैधानिक अधिवेशन बोलावून सर्व कारवाई पूर्ण करुन महिन्याभरात आश्वासन दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण आणि आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात नारायण राणेंसह मराठा समाजातल्या नेत्यांशी चर्चा केली. मेगा भरतीत मराठा तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही. खात्री झाल्यावरच मेगा भरती कऱण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.