बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

आरे कॉलनीतील फिल्मसिटीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. 

Updated: Jul 23, 2017, 07:26 PM IST
बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू title=

मुंबई : आरे कॉलनीतील फिल्मसिटीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. 

या मुलाचे नाव विहान गुरूडा असून तो आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी आला असताना ही घटना घडली. फिल्मसिटीमधील सुरक्षा रक्षक कमलाकर माळी यांचे नातेवाईक फिल्मसिटीमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. 

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विहानला तातडीनं जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.