चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण

राज्यभरात सध्या संतापाचं वातावरण 

Updated: Sep 7, 2018, 04:44 PM IST
चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण title=

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाचं वातावरण आहे. आमदार राम कदम यांना भाजपचं नेतृत्व पाठिशी घालतंय याचं उत्तम उदाहरण आता पुढे आलं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, राम कदम यांनी माफी मागितली, आता विषय संपला आहे.' तिकडे राज्यभरात राम कदमाच्या वक्तव्यावरून आंदोलनं निदर्शनं सुरू असताना भाजपचं नेतृत्व मात्र त्यांच्या आमदाराच्या पाठिशी ठाम पणे उभं राहताना दिसत आहे. 

कदमांच्याविरोधात रान पेटल्यावर तीन दिवसांनंतर त्यांनी माफी मागितली होती. दुसरीकडे बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राम कदम यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणा आणि ५ लाख घेऊन जा असे आवाहन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.