न्यायालयानं पाचव्यांदा फेटाळला भुजबळांचा जामीन अर्ज

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज पाचव्यांदा पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.

Updated: Dec 18, 2017, 11:14 PM IST
न्यायालयानं पाचव्यांदा फेटाळला भुजबळांचा जामीन अर्ज  title=

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज पाचव्यांदा पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.

पीएमएलए  कायदा कलम ४५ हा सर्वोच्च न्यायालयाने २२ नोव्हेंबरला रद्द केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक झालेल्यांना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

कलम ४५ नुसार आरोपी निर्दोष आहेत हे न्यायालयाला पटत नाही आणि सरकारी वकिलांचं म्हणणं आरोपींच्या जामीन अर्जावर येत नाही तोवर आरोपीला जामीन देता येत नाही. या अटी कलम रद्द झाल्या होत्या. 

मात्र, पीएमएलए कायदा कलम २४ नुसार छगन भुजबळ यांच्यावर आरोप असलेल्या ८५७ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारांपैंकी केवळ २० कोटींचा गैरव्यवहार केला नसल्याचा युक्तीवाद केला होता. मात्र उरलेल्या ८३७ कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराबाबत भुजबळ स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत. ईडीचा हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून जामीन फेटाळला.