BREAKING | सीईटी 2022 शी संबंधित सर्वात मोठी बातमी

विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्तवाची बातमी आहे. सीईटी 2022 ची (CET 2022) परीक्षा लांबणीवर गेली आहे.

Updated: Apr 21, 2022, 06:56 PM IST
BREAKING | सीईटी 2022 शी संबंधित सर्वात मोठी बातमी title=

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्तवाची बातमी आहे. सीईटी 2022 ची (CET 2022) परीक्षा लांबणीवर गेली आहे. जीईई (GEE) आणि नीटच्या (Neet) परीक्षांमुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबातची माहिती दिली आहे.  (cet 2022 exams postponement information on higher and technical education minister uday samant) 

नक्की कारण काय? 

तंत्र शिक्षण विभागाकडून होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचं आयोजन हे  3-10 जून दरम्यान करण्यात आलं होत्या. मात्र जीईई (GEE) आणि नीटच्या (NEET) प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटीचं आयोजन हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं आहेत. त्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच लवकरच वेळापत्रक जाहीर करु, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

दरम्यान काही दिवसांआधी जीईई च्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जीईई परीक्षेच्या कालावधीदरम्यानच नीटच्या परीक्षा होत्या. त्यामुळे अभ्यासासाठी आणि विविध कारणांमुळे सीईटीची परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला होता. 

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या मागणीची दखल घेतली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

MHT CET परीक्षा म्हणजे काय?

BE, BTech, BPharm किंवा DPharm अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET आयोजित केली जाते. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटांमध्ये घेतली जाते. सीईटीचा पेपर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तर 80 टक्के अभ्यासक्रम हा इयत्ता 12 वीवर आधारित आणि उर्वरित टक्केवारी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 11वीवर आधारित असेल.

JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल.. तारखा लवकरच जाहीर करू.