मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना मध्य़ रेल्वेनं चांगलाच दणका दिलाय़. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 रुपये दंड वसूल केलाय.
शिवाय 8 लाख 23 हजार 806गुन्ह्यांची नोंदही करण्यात आलीय. गेल्या वर्षी गुन्ह्यांचा आकडा 6 लाख 77 हजार 677 येवढा होता. त्यातून 30 कोटी 84 लाख 27 हजार 22 रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
यावर्षी गुन्ह्यांच्य़ा नोंदीत सुमारे 22 टक्क्य़ांची वाढ झालीय. तर दंडाच्या रकमेत सुमारे 29 टक्के वाढ झालीय. थोडक्यात काय तर फुकट्या प्रवाशांच्या संख्येत या वर्षी वाढ झालेली दिसतेय.
राज्यशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची तर संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांच्या नावांची घोषणा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद ताव़डे यांनी केली. 5 लाख रूपये रोख, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बाबा पार्सेकरांनी हौशी,प्रायोगिक तसच व्यावसायिक रंगभूमीवर आत्तापर्यंत 485 नाटकांचे नेपथ्य केले आहे.