Nitesh Rane : महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा, भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी

भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Son) यांचे  पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

Updated: Jul 21, 2022, 11:35 PM IST
Nitesh Rane : महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा, भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी title=

मुंबई : भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Son) यांचे  पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नितशे राणे यांनी महाराष्ट्रात काही राज्याच्या धर्तीवर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक निष्पाप महिलांना अडकवलं आणि छळ केला जातोय. त्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा करण्यात यावा, असं आमदार राणे यांचं म्हणंन आहे. राणे यांनी ट्विटद्वारे ही मागणी केलीय. तर सपाचे आमदार अबु आझमी यांना या मागणीचा विरोध केला आहे. (central minister narayan rane son and bjp mla nitesh rane demanded anti conversion law)

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? 

गुजरात, मध्यप्रदेश उत्तरप्रदेशप्रमाणं महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची वेळ झालीय असं नितेश राणे म्हणालेत. निष्पाप महिलांना अडकवलं आणि छळलं जातंय त्यांच्या संरक्षणासाठी धर्मांतरविरोधी कायदा आणा अशी मागणी त्यांनी शिंदे सरकारकडे केलीय. 

भाजपशासित अनेक राज्यात हा कायदा बनवला गेलाय. ज्यात जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास तुरुंगावासाची तरतूद आहे.  त्यामुळं राणेंच्या या मागणीमुळे महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत की काय अशी चर्चा सुरू झालीय.

तर अबु आझमी यांनी अशा कायद्याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे या मुद्द्यावरुन पुढे राणे-आझमी यांच्यात राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.