भांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक

नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

Updated: Apr 23, 2018, 05:05 PM IST
भांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक title=

मुंबई : २७ एप्रिलपासून मुंबईतील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भांडुप येथील नवजीवन मैदानावर होणार आहे. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या मुंबईतील सर्वात मोठ्या आणि ग्लॅमरस स्पर्धेसाठी सिनेसृष्टीतील नामांकित सिनेकलाकारानी कंबर कसली असून स्टार स्पोर्टस वाहिनीच्या स्पोर्ट्स लीग मधील अनेक नामवंत खेळाडू यासाठी उपस्थिती लावणार आहेत. 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अशोक पाटील, सुनिल राऊत, सभापती यशवंत जाधव , सुवर्णा करंजे, विशाखा राउत, रमेश कोरगावकर, उमेश माने प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहतील. सदर प्रसंगी रिशांक देवाडिगा यांचा क्रिडाभूषण आणि डॉ.गजानन रत्नपारखी यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उद्योजक आनंद पेडणेकर आणि श्री श्याम देसाई संबोधित करतील.