बिटकॉईन गैरव्यवहार, सनी लिओनी, प्राची देसाई, झरीन खान, नेहा धुपियाची नावं उघड

बिटकॉईन गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याची सक्तवसुली संचलनालयानं तब्बल आठ तास केलेल्या चौकशीत अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं पुढं आली आहेत.

Updated: Jun 5, 2018, 08:54 PM IST
बिटकॉईन गैरव्यवहार, सनी लिओनी, प्राची देसाई, झरीन खान, नेहा धुपियाची नावं उघड title=

मुंबई : बिटकॉईन गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याची सक्तवसुली संचलनालयानं तब्बल आठ तास केलेल्या चौकशीत अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं पुढं आली आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह सनी लिओनी, प्राची देसाई, झरीन खान, नेहा धुपिया, हुमा कुरेशी, नर्गिस फक्री, आरती छाब्रा, सोनल चौहान, करिश्मा तन्ना यांची नावं पुढं आली आहेत. या सर्वांचीही आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या सर्व सेलिब्रिटींनी बिट क्वाईनचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांची दुबईत भेट घेतली आणि लोकांना गुंतवणूक करण्यासाठी बिट कॉईनचं प्रमोशन केल्याचं या चौकशीतून उघड झालंय. 

बिटकॉईन गैरव्यवहारातला मुख्य आरोपी असलेल्या अमित भारद्वाजशी संबंध असल्याच्या संशयावरून राज कुंद्राची कसून चौकशी कऱण्यात आली. भारद्वाजने दुबाई आणि सिंगापूरमध्ये अनेक सेमिनार आयोजिक केले. बिटकॉईनबाबत त्याने एक पुस्तकही लिहीलं आहे. खुद्द शिल्पा शेट्टीने ट्वीटरवरून या पुस्तकाची जाहिरातही केली होती. राज कुंद्राचं यापूर्वी आयपीएल सट्टेबाजीत नाव आलं होतं. तसंच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर राज कुंद्रावर क्रिकेटच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होण्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय.