शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा, अमोल मिटकरी यांचं ट्वीट

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे पुन्हा राष्ट्रवादी

Updated: Feb 4, 2020, 07:49 PM IST
शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा, अमोल मिटकरी यांचं ट्वीट title=

मुंबई : शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये विचारसरणीचा पेच निर्माण होतो की काय असा प्रश्न पुढे येत आहे. कारण तारखेनुसार म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो. तर दुसरीकडे आतापर्यंत शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करते.

तर दुसरीकडे राज्य सरकार देखील 19 फेब्रुवारी म्हणजेच तारखेनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे की, तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारी रोजीचं शिवजयंती साजरी करा. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर नेमका काय निर्णय घेतात, किंवा अमोल मिटकरी यांनी दिलेल्या आवाहनाला काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

आताच्या हेडलाईन्स

'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे

हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...

World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर

'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

सेलिब्रिटींची मजेशीर टोपण नावं माहितीयेत का?