अडचणीत आलेल्या मेहतांचे मंत्रिमंडळातल्या सहका-यांवरच गंभीर आरोप

एसआरए योजनेत बिल्डरला ५०० कोटींचा फायदा करून दिल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मंत्रीमंडळातल्या सहका-यांवर आरोप केले आहेत. 

Updated: Aug 2, 2017, 03:51 PM IST
अडचणीत आलेल्या मेहतांचे मंत्रिमंडळातल्या सहका-यांवरच गंभीर आरोप  title=

मुंबई : एसआरए योजनेत बिल्डरला ५०० कोटींचा फायदा करून दिल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मंत्रीमंडळातल्या सहका-यांवर आरोप केले आहेत.

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी स्वपक्षीय आणि मंत्रिमंडळातील सहकारीच षडयंत्र करत असल्याचा धक्कायदाय आरोप मेहतांनी केलाय. त्यामुळं सरकारमध्ये सारंकाही आलबेल सुरू नसल्याचं पुढं आलंय. आपल्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून पक्षातले पदाधिकारीच टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.

बिल्डरला ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली.

त्या फाईलवर चुकून शेरा दिल्या असून दुसऱ्या दिवशी ती फाईल एसआरएला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केला. मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत दिली.

याप्रकरणी जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला अडणीत आणले आणि ही यांची पारर्दशकता असल्याचे म्हटले. प्रकाश मेहतांच्या घोळामुळे भर सभागृहात सरकाराची नाचक्की झालेय. एसआरए प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. मेहताच्या निष्काळजीपणामुळे बिल्डरला ५०० कोटींचा फायदा झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.