BREAKING : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून हायअलर्ट

राज्यात गृहविभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Updated: Jun 26, 2022, 08:15 PM IST
BREAKING : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून हायअलर्ट title=

मुंबई : राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागानं हा अलर्ट जारी केलाय. शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच मुंबई आणि एमएमआरडीए भागात विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात राजकीय पेचप्रसंगामुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यामुळे अलर्ट देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन सुरु आहे. अनेक आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदार आहेत. हे सर्व आमदार गुवाहाटीत असून शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. आज ठाकरे सरकारमधील मंत्री उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्राकडून ही बंडखोर आमदारांसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. बंडखोर आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.