टॉयलेटमध्ये मोबाईल काढायला गेला, आणि त्याला वाचवायला आलं, मुंबई अग्निशमन दल

चुकूनही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका, पण आज काल मोबाईलची सवय एवढी वाढलीय की, तो टॉयलेटमध्ये नेण्यात येतो.

Updated: Jul 17, 2018, 12:23 PM IST
टॉयलेटमध्ये मोबाईल काढायला गेला, आणि त्याला वाचवायला आलं, मुंबई अग्निशमन दल  title=

मुंबई : चुकूनही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका, पण आज काल मोबाईलची सवय एवढी वाढलीय की, तो टॉयलेटमध्ये नेण्यात येतो. मुंबईतील कुर्ल्यात एका युवकाचा मोबाईल टॉयलेटमध्ये पडला. कमोडमध्ये प़डलेलला हा मोबाईल काढण्यासाठी त्याने अटोकाट प्रयत्न केला. कमोडमध्ये अखेर हात टाकून त्याने मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचं नशीब जास्तच खराब होतं. या तरूणाचा हात कमोडमध्ये अडकला.

या तरूणाचा कमोडमध्ये अडकलेला हात निघता निघत नव्हता. हा तरूण १९ वर्षांचा असून तो उत्तर प्रदेशातील आझमगढचा आहे, सध्या तो कुर्ल्यात राहत आहे. तेथेच ही घटना घडली, रोहित राजभर असं या तरूणाचं नाव आहे. या तरूणाला फोन तर मिळालाच नाही, पण अडकलेला हात कसा काढावा, हे कुणालाही कळत नव्हतं, तेव्हा थेट अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं.

रोहित राजभर हा आपले काका लालमणी वर्मा यांच्या घरी आला होता. हा टॉयलेट इंडियन स्टाईल होता. दुसऱ्या हाताने त्याने दार उघडत, घरातील व्यक्तींना त्याने मदतीने बोलावलं, अखेर शेजारी श्रीकृष्ण यादव यांनी अग्मिशमन दलाला फोन लावला, आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर अडकलेला हात बाहेर काढला. 

रोहितचा हात प्रचंड दुखत असल्याने त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखवण्यात आलं, यानंतर त्याला डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवलं, रोहितचा हात वाचला, आणि मोबाईल गेला, असला तरी थोडक्यात निभावलं असं म्हणता येईल.