मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीसह ११ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. मकोका न्यायालयानं या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अरुण गवळीच्या वकिलांकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. आज उच्च न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावत अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवलेली आहे.
Bombay High Court upholds the life imprisonment of gangster Arun Gawli in the 2008 murder of Shiv Sena corporator Kamlakar Jamsandekar. pic.twitter.com/bvJnthtjMv
— ANI (@ANI) December 9, 2019
>
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची 2 मार्च 2007 रोजी त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अरुण गवळीनेच कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याचम पोलिस तपासात समोर आलं होतं. यासाठी गवळीने 30 लाखाची सुपारी दिली होती. अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
न्यायालयाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह दहा आरोपींनासुद्धा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अरुण गवळीसह इतर आरोपींची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे.