बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. तब्बल 22 संघटना या संपात सहभागी झाल्यायेत. 

Updated: Aug 14, 2017, 08:41 PM IST
बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगारांचे कामबंद आंदोलन title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. तब्बल 22 संघटना या संपात सहभागी झाल्यायेत. 

सुमारे अडीच लाख कामगारांनी या संपात सहभाग नोंदवल्याचं युनियनच्या वतीनं सांगण्यात आलंय. 

आज रात्री बारा वाजल्यापासून भारतभरातील शूटिंगच्या प्रत्येक ठिकाणी काम बंद करण्याचा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईजने युनियननं दिलाय. यामध्ये आर्ट डायरेक्टर असोसिएशन, म्युझिशियन्स असोसिएशन यांचाही सहभाग आहे.