महापालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर घालण्यात आलेली बंदी अखेर मागे

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेबाबत बोलण्यापासून अधिकारी पळ काढत आहेत.

Updated: Mar 16, 2019, 08:42 AM IST
महापालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांवर घालण्यात आलेली बंदी अखेर मागे title=

मुंबई: हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी घातली. इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या पत्रकारांना कॅमेरा आत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे समजते. हिमालय पादचारी पूल दुर्घटनेबाबत बोलण्यापासून अधिकारी पळ काढत आहेत. माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये, म्हणून ही बंदी घातली की काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनीही माध्यमांना बघून पळ काढला. विजय सिंघल यांच्याकडे रस्ते आणि पूल यांची जबाबदारी आहे. सिंघल यांनी माध्यमांवरील राग आपल्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर काढला. आयुक्त अजोय मेहतांनी तर त्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली. मात्र, माध्यमांनी टीकेची झोड उठल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रवेश देण्यात आला. 

Mumbai bridge collapse: त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वडिलांना वाचवले

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येत आहे. जे. जे. पुलाची उत्तर वाहीनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. उत्तरेकडे जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद तर दक्षिणेकडून येणारी वाहतूक एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याकडून मेट्रोच्या दिशेने वळवण्यात आलीय. उत्तरेकडे जाण्यासाठी मोहम्मद अली रोड, पी डीमेलो रोड आणि मरीन ड्राईव्हचा पर्यायी मार्ग आहे. सीएसएमटीवरून दादरकडे जाणाऱ्या गाड्यांना महापालिका मार्गावरून मेट्रो जंक्शन आणि तिथून मोहम्मद अली मार्गाने दादरकडे वळवण्यात आली आहे.