मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यंमत्र्यांची सीएम कॉन्फरन्स बोलावली आहे. या बैठकीआधी अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.
यानंतर उद्या नारायण राणेही स्वतः दिल्लीत जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अमित शाह आणि फडणवीस यांच्या चर्चेत राणेंच्या मंत्रिपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशावरुन चर्चा सुरु आहे. पण राणेंच्या प्रवेशाला आणखी मूहुर्त मिळालेला नाही.