सरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा

सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय.  सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2017, 02:19 PM IST
सरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा title=

मुंबई : सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय.  सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय. 

सरपंचपदी कळमेश्वर १४, रामटेकमध्ये ४, उमरेडमध्ये ४, भिवापूरमध्ये ५. कुहीमध्ये १ तर हिंगणामध्ये ४ ठिकाणी विजयश्री खेचत भाजपने बाजी मारलीय. तर राज्यभरातही भाजपची घोडदौड कायम आहे. हिंगणघाटमध्ये १३  पैकी ११ सरपंच,उस्मानाबाद ३३ पैकी१८ सरपंच, तर अमरावती ४१ पैकी २६ सरपंचपदी भाजपने आपला दावा सांगितलाय. 

पाहा लाईव्ह निकाल अपडेट, इथं करा क्लिक

दरम्यान, काँग्रेस सोडल्यावर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या नारायण राणेंच्या समर्थ विकास पॅनलनं सिंधुदुर्गातल्या सगळ्या प्रमुख तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी घेतलीय. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीमध्ये राणेंच्या समर्थ विकास पॅनल विजयी होताना दिसत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 ग्रामपंचयत निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 46 ग्रामोनचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असल्याने 279 ग्रामपंचायतींचे निकाल आज मतपेटीतून बाहेर येतील यापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं यांच्या पक्षाने 29 भाजपने 10 तर सेनेने 7 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्याचा दावा केलाय.