मुंबई : मुंबईत शनिवारी 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) हल्लाबोल मोर्चा आणि भाजपचं (Bjp) आंदोलन पार पडलं. मविआने राज्यात महापुरुषांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महामोर्चा काढला. तर भाजपने संजय राऊतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि सुषमा अंधारेंनी संतांचा अपमान केलाय. त्यामुळे राऊत आणि अंधारेंनी जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी भाजपासाठी माफी मागो आंदोलन पार पडलं. दरम्यान मविआच्या हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने या पैसे वाटपाचा एक व्हीडिओ ट्विट केलाय. (bjp spokesperson keshav upadhyay alleges that money was distributed in mahavikas aghadi march)
मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य
आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने…. pic.twitter.com/I7XvM6Wf0B— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 17, 2022
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पैसे वाटतानाचा व्हीडिओ ट्विट केलाय. मुंबईतील पत्रकार संघाजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचं दृश्य आहेत. मविआ मोर्चात थोडीफार लोकं जमली ती सुध्दा अशा पध्दतीनं असं ट्विट केशव उपाध्येंनी केलंय.