Navratrotsav 2022 : नवरात्रीत दाखवा मराठमोळा स्वॅग आणि जिंका Apple 11 Iphone

आता आयफोन (Apple 11 Iphone) जिंकण्यासाठी गरबाप्रेमींमध्ये आयफोन जिंकण्यासाठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. 

Updated: Sep 30, 2022, 12:18 AM IST
Navratrotsav 2022 : नवरात्रीत दाखवा मराठमोळा स्वॅग आणि जिंका Apple 11 Iphone title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सवानंतर आता राज्यासह देशात नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) माहोल पहायला मिळतोय. कोरोनाच्या (Corona Restrictions) 2 वर्षानंतरं पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा गरबाप्रेमींमध्ये (Garaba) आनंदाचं वातावरण पहायला मिळतं. ठिकठिकाणी गरबा रास आणि दांडियाचं (Dandiya) आयोजन करण्यात आलंय. भाजपचा दांडीया उद्यापासून सुरु होतोय. या मराठा दांडियामध्ये बक्षीस देखील ठेवण्यात आली आहेत. (bjp orgnise marathi dandiya mahotsav dress up marathi traditional and win apple 11 iphone at kalachowki)  

मराठमोळी वेशभूषा करणाऱ्या 2 विजेत्यांना रोज दोन आयफोन बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर असा हा मराठी दांडिया होणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी दांडिया आयोजित करण्यात आला आहे. या मराठी दांडीया महोत्सवाचं आयोजन हे काळाचौकी येथील अभ्यूदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानात करण्यात आलं आहे. आता भाजपने मराठी मतदारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे आता आयफोन जिंकण्यासाठी गरबाप्रेमींमध्ये आयफोन जिंकण्यासाठी स्पर्धा पहायला मिळणार आहे.    

रात्री 12 पर्यंत लाउडस्पीकर

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.