मुंबई : भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ख्रिश्चनांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, माफी मागण्यास शेट्टी यांनी नकार दिला आहे. वाणीस्वातंत्र्य मी उपभोगणारच, असं गोपाळ शेट्टींनी ठामपणे सांगितलंय. ख्रिश्चनांबाबतच्या वक्तव्यावर शेट्टी ठाम असले तरी भाजपने मात्र त्यांच्या या वक्तव्याबाबत असहमती दर्शवली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी झी मीडियाशी बोलताना या वक्तव्याबाबत असहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता त्यामुळे गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
शेट्टी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटून राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान गोपाल शेट्टी यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.