मुंबई : १९८०च्या दशकात तत्कालीन जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता गेल्या ४० वर्षांत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची पंरपरा आहे. कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणाऱ्या या मतदारसंघात लागोपाठ दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधी निवडून येत नाही.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबईतून भाजपच्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांचा ३,१७,१२२ मतांनी पराभव केला होता. मात्र, यंदा शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने सोमय्या यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे बराच काळ या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीचा घोळ सुरु होता. अखेर भाजपकडून शेवटच्या क्षणी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली होती.
याशिवाय, ईशान्य मुंबईतील प्रचारात शिवसेनेचे नेते मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी मनापासून उतरले नसल्याचे चित्र दिसत होते. मनोज कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही कोटक यांच्या प्रचाराला हजेरी लावली होती. मात्र, तरीही शिवसेनेची मते किती प्रमाणात भाजपकडे वळतात, यावर ईशान्य मुंबईचे गणित अवलंबून आहे.
लाईव्ह अपडेटस्
* ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक विजयी
* ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट; मनोज कोटक दोन लाखांनी आघाडीवर
* ईशान्य मुंबईत भाजपच्या मनोज कोटक यांची दमदार विजयाकडे वाटचाल; १,१३,३४७ मतांनी आघाडीवर
* ईशान्य मुंबईत मनोज कोटक ४४४८१ मतांनी आघाडीवर
* ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांना १५ हजारांची आघाडी; संजय दीना पाटील पिछाडीवर
* ईशान्य मुंबईत मनोज कोटक आघाडीवर
* थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात; मनोज कोटक आणि संजय पाटील यांच्यात कोण वरचढ ठरणार?
Counting of votes for #LokSabhaElections2019 begins. #ElectionResults2019 pic.twitter.com/ez0j6ivcnD
— ANI (@ANI) May 23, 2019