भाजपला शिवसेनेसोबत तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

'भाजपला शिवसेनेचे ऐकावे लागणार आहे. भाजपपुढे तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही.'

Updated: Oct 29, 2019, 04:57 PM IST
भाजपला शिवसेनेसोबत तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक title=
संग्रहित छाया

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. महायुतीची जबाबदारी आहे लवकर सरकार बनवले पाहिजे. मात्र, त्याचवेळी त्यांना शिवसेनेचे ऐकावे लागणार आहे. भाजपपुढे तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही. जर सत्ता स्थापन झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी सरकार कोसळले तर नंतर पर्याय म्हणून सरकार निर्माण करण्याची वेळ येईल तेव्हा विचार होऊ शकतो. राज्यात सरकारच निर्माण होत नसेल तर काही तरी भूमिका घ्यावी लागेल, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणालेत.

नवाब मलिक म्हणालेत, राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. महायुतीची जबाबदारी आहे लवकर सरकार बनवले पाहिजे. मागील पाच वर्ष ज्या पद्धतीने भाजपाने शिवसेनेचे खच्चीकरण केले आता शिवसेनेला वाटतं आमच्याशिवाय सरकार होत नाही. भाजप लोकांना गृहीत धरत होते या राज्यात विरोधक राहणार नाही, मात्र जनतेने कौल दिलाय आणि जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून शिवसेनेशिवाय काही होणार नाही हे भाजपला कळत आहे. त्यामुळे त्यांना जे अपेक्षित आहे ते करून घेण्यासाठी दबावतंत्र निर्माण करत आहेत.

 आता शिवसेना जे हवं ते साध्य करणार की भाजप पुढे झुकणार हे सगळं लोक पाहत आहेत. राज्यपाल मोठा पक्ष म्हणून भाजपला आमंत्रण देणार, त्यात भाजप शपथविधीत शिवसेनेला बरोबर घेते का बे बघावं लागेल. मात्र शिवसेना ज्या पद्धतीने आक्रमक झाली आहे ते पाहता भाजपला तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही. सत्तेसाठी भाजपा काहीही करू शकते. विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनेची काय भूमिका असेल यावर पुढचे राजकारण सुरू होणार आहे., असे नवाब मलिक म्हणालेत.

नवाब मलिक  ठळक बाबी :

- राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे
- महायुतीची जबाबदारी आहे लवकर सरकार बनवले पाहिजे
- मागील पाच वर्ष ज्या पद्धतीने भाजपाने शिवसेनेचे खच्चीकरण केले आता शिवसेनेला वाटतं आमच्याशिवाय सरकार होत नाही
- भाजपा लोकांना गृहीत धरत होते या राज्यात विरोधक राहणार नाही, मात्र जनतेने कौल दिलाय आणि जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून शिवसेनेशिवाय काही होणार नाही हे भाजपला कळतंय
- त्यामुळे त्यांना जे अपेक्षित आहे ते करून घेण्यासाठी दबावतंत्र निर्माण करतायत
- आता शिवसेना जे हवं ते साध्य करणार की भाजपा पुढे झुकणार हे सगळं लोक पाहतायत
- राज्यपाल मोठा पक्ष म्हणून भाजपाला आमंत्रण देणार, त्यात भाजपा शपथविधीत शिवसेनेला बरोबर घेते का बे बघावं लागेल
- मात्र शिवसेना ज्या पद्धतीने आक्रमक झाली आहे ते पाहता भाजपाला तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही
- सत्तेसाठी भाजपा काहीही करू शकते
- विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनेची काय भूमिका असेल यावर पुढचं राजकारण सुरू होणार आहे
- सत्ता स्थापन झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यावेळी सरकार कोसळले, नंतर पर्याय सरकार निर्माण करण्याची वेळ येईल तेव्हा विचार होऊ शकते
- राज्यात सरकारच निर्माण होत नसेल तर काही तरी भूमिका घ्यावी लागेल