मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीचे संसदेतही पडसाद उमटलेत.
या आगीच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. तर, दुसरीकडे कमला मिल, फिनिक्स मिलमधील हॉटेल्स, पब हे जणू काही मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे या प्रकरणी विशेष फायरऑडिट करावं अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभेत केलीय.
मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
मुंबईतील कमला मिल कंपाऊंड आगीचे संसदेत पडसाद