शिवसेनेला मोठा धक्का! सूरतमध्ये समजावयला गेलेले आमदारच शिंदे गटात सामील

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन नेते एकनाथ शिंदे यांना सूरतमध्ये भेटले होते  

Updated: Jun 23, 2022, 05:58 PM IST
 शिवसेनेला मोठा धक्का! सूरतमध्ये समजावयला गेलेले आमदारच शिंदे गटात सामील title=

Maharashtra Political Crisis : शिवसेनेला (Shivsena) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांना मनवायला गेलेले मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रविंद्र फाटकही (Ravindra Phatak) गुवाहाटीतील हॉटेलवर पोहोचणार असल्याची माहिती आहे. 

कृषीमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) आणि माजी वन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे आमदार मुंबईहून गुवाहाटीसाठी रवाना झाले आणि त्यांच्यासोबत आमदार रविंद्र फाटकही असल्याची माहिती मिळत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सूरतला गेले. एकनाथ शिंदे यांना मनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंदे नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सूरत गेले. त्यांच्यात एक तास चर्चाही झाली. 

पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नाही. आता तर त्यांना समजावयाला गेलेले रविंद्र फाटकच गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.