मुंबई : मुंबई नजिकच्या सर्वात गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक असलेल्या भिवंडी - कल्याण - शीळ रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर येत्या २ वर्षात भिवंडी - कल्याण - शीळ रस्त्याचं काम पूर्ण होईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.
या रस्ताच्या ठिकाणी प्रस्तावित कल्याण-महापे मेट्रो होणार आहे. तेव्हा भिवंडी - कल्याण - शीळ हा रस्ता सहा लेनचा केला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. तुर्तास या रस्तावरची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी दोन वर्षं वाट पहावी लागणार आहे.