बनावट पासपोर्टपासून सावध! अशी केली जाते फसवणूक

तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. अन्यथा तुम्हाला मोठा संकटाला सामोरे जावे लागेल. 

Updated: Jun 20, 2020, 09:11 AM IST
बनावट पासपोर्टपासून सावध! अशी केली जाते फसवणूक title=
संग्रहित छाया

मुंबई : तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. अन्यथा तुम्हाला मोठा संकटाला सामोरे जावे लागेल. कारण मुंबई सायबर क्राईमने सावधान राहण्याची सूचना केली आहे. बनावट पासपोर्ट करुन त्याचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याची बाब पुढे आले आहे. त्यासाठी सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सायबर भामटे हे एखादा पासपोर्ट मॉडिफाय करुन बनावट पासपोर्ट बनवतात आणि त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करुन विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत, असे  महाराष्ट्र सायबर विभागाच्या लक्षात आले आहे.

आजच्या घडीला भारतीय पासपोर्टच्या टेमप्लेट (template) या डार्कनेटवर आणि इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करुन लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. तेव्हा अशा बनावट पासपोर्टपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सायबरने आवाहन म्हटले आहे की, सावध रहा ! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. तुमच्या पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा. ज्यामुळे तुमच्या शिवाय अन्य कोणाला ती फाईल अघडता येणार येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल तर त्या प्रतीवर निळ्या पेनाच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा.

फसवणूक टाळण्यासाठी, ही घ्या खबरदारी

- पासपोर्टच्या issuing date व expiry date मध्ये १० वर्षाचा फरक असला पाहिजे .
- पासपोर्टला  ३६ किंवा ६० पाने असली पाहिजेत
- font ची size आणि alignment एकसारखी असली पाहिजे .
- पासपोर्ट वरील भारताचा emblem नीट तपासून बघा. 
- पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पण पासपोर्ट क्रमांक perforated स्वरूपात असला पाहिजे 
- जर जुना पासपोर्ट पण उपलब्ध असल्यास त्यावरील अन्य माहिती जसे की आई वडिलांचे व आपल्या जोडीदाराचे नाव नवीन व जुन्या पासपोर्टवर एकच असले पाहिजे. 
- जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर पण क्र ३ ते ३४ वर भारताचा emblem (अशोक स्तंभ ) असला पाहिजे.

कोणाची फसवणूक झाली असेल तर...

जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवावी. तसेच या गुन्ह्यांची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.