बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर?

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रूवारीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 09:05 PM IST
बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर? title=

मुंबई : बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रूवारीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

संतापलेले कर्मचारी

बेस्टच्या खाजगीकरणाविरोधात कामगार संघटनांचे बंदचे आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेस्टचे कर्मचारी प्रशासनाच्या धोरणावर नाराज आहे. पगारांची होत असलेली चालढकल आणि त्यातच काही बसेस बंद केल्या. त्यामुळे कर्मचारी संतापलेले आहेत.

४५० बसगाड्या मंजूर

आजच्या बेस्ट समितीच्या सभेत ४५० बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने मंजूर केल्याच्या विरोधात १५ फेब्रूवारीपासून बंद करण्याचे आवाहन केले आहे. कामगारांनी स्वतःहून बंद पाळण्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीने कर्मचा-यांना आवाहन केले आहे.