मुंबई : गुरूवार मध्यरात्रीपासून तुमचा बेस्ट प्रवास महागणार आहे. बेस्ट दरवाढीच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई वाहतूक विभाग हिरवा कंदील देणार आहे. भाडेवाढीबाबतचा कोणताही प्रस्ताव बेस्टकडे आला नसल्याचं बेस्टने सांगितलंय. मात्र आल्यावर गुरूवारपर्यंत बेस्ट भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हा प्रवास महागण्याची शक्यता आहे. चार किलोमीटरच्या पुढच्या टप्प्यांना ही भाडेवाढ लागू असेल. १ रूपया ते १२ रूपये या दरम्यान विविध टप्प्यांनुसार ही भाडेवाढ असेल. मात्र ० ते ४ किमीपर्यंतच्या टप्प्यासाठी कोणतीही भाडेवाढ नसेल.
एसी बसचा प्रवासही ५ रूपयांनी वाढणार आहे. बेस्टन नुकत्याच एसी हायब्रीड बसेस ताफ्यात समाविष्ट केल्या. बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बीकेसी या मार्गावर ही सेवा सुरू आहे... या मार्गावर प्रवास करणा-यांना याचा फटका बसणार आहे. विद्यार्थी पासच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.