Mumbai Local News : लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वे कायद्याच्या कलमात अशा आरोपींना कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा होते. दुसऱ्यांदा त्या आरोपीने पुन्हा तोच गुन्हा केल्यास त्याला सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठाविण्यात येते. मात्र उच्च न्यायालयाने या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटलेय, सार्वजनिक मालमत्ता काळजी घेणे आवश्यक आहे. समाजातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.
2019 मध्ये कुर्ला येथे मुंबई लोकल ट्रेन गाड्यांवर दगडफेक आणि लहान रॉड टाकल्याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला सत्र न्यायालयाने सोमवारी 10 वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावली. चार वेगवेगळ्या प्रकरणात आणि खुनाचा प्रयत्न करणे या आरोपाखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. पहिल्या प्रकरणात, 16 जुलै 2019 रोजी सायंकाळी एक विद्यार्थी आपल्या कॉलेजमधून घाटकोपर येथील त्याच्या घरी जात होता. दुखापतीमुळे तोल गेल्याने तो खाली पडणार असतानाच त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ जखमी झाला होता. तसेच त्याच दिवशी आणखी एक व्यक्ती कुर्ल्याहून टिटवाळ्याला जात होती. त्यावेळी त्याला दगड लागून तो जखमी झाला होता. तसेच दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. तर आणखी एका घटनेत कुर्ला येथे प्रवाशावर लोखंडी रॉड फेकण्यात आला होता.
मुंबई शहर आणि उपनगारात लोकलवर दगडफेक होऊन अनेक जण जखमी झाले होते. तसेच अनेकांना गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. लोकल जात असताना दगडफेकीचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. या दगडफेकीत ज्यांचा काही दोष नसताना दगडफेकीची शिक्षा मिळत होती, त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, मुंबईत एसी लोकल दाखल झाल्यानंतरही दगडफेक झाल्याचे दिसून येत आहे. एसी लोकल दगड फेक करुन काचा तोडल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, दगडफेकीबाबत न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवले आहे. तिथल्या कचरा वेचणाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात ही दगडफेक केल्याचा आरोपीचा बचाव न्यायालयाने साफ फेटाळून लावला. आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचेही आरोपीने या प्रकरणी सुनावणीच्यावेळी म्हटले होते. मात्र, वैद्यकीय चाचण्यांवरुन त्याच्या मानसिकतेत कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलेय. आरोपी हा कुटुंबासाठी एकटा कमावणारा असल्याची बाब वगळता त्याला शिक्षेत दया दाखवावी असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. मात्र, त्याचा गुन्हा हा समाजाच्यादृष्टीने घातक आहे. तेव्हा त्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही. तसेच त्याने दगडफेक करुन जे जखमी झालेत. त्यांना त्रास होत आहे. त्याचे आयुष्य हे आता पूर्वीसारखं राहिलेले नाही, असे निरिक्षण न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.