Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...

Backstreet Boys Viral Video: बॅकस्ट्रीट बॉईजचा नुकताच एक शो मुंबईत संपन्न झाला आहे. परंतु यावेळी एक लज्जास्पद प्रकार (Backstreet Boys) घडला आहे. यावेळी भर कार्यक्रमात चक्क गायकानं प्रेक्षकांच्या गर्दी अंतर्वस्त्र टाकली आणि एकच खळबळ उडाली. सध्या या प्रकारामुळे बॅकस्ट्रीट बॉईज (Viral News) ट्रोल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 6, 2023, 01:24 PM IST
Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच... title=
फाईल फोटो

Backstreet Boys Viral Video: सध्या तरूणाईला भुरळ आहे ती म्हणजे रॉकबॅण्ड आणि पॉपम्युझिकची. ही तरूणाई आज जगातील अनेक नामवंत पॉप गायकांना (Backstreet Boys Viral Video) आणि रॉक ब्रॅण्डला फॉलो करतात आणि त्यांची गाणी ऐकतात. त्यातलंच एक नावं आहे ते म्हणजे 'बॅकस्ट्रीट बॉईज'चं. यावेळी तब्बल 13 वर्षांनंतर त्यांचा शो भारतात झाला आहे. 4 आणि 5 मे रोजी मुंबई आणि दिल्लीत त्यांचे शो गाजले होते. या शोला हजारो रूपयांची तिकीटं काढून तरूणवर्गानं गर्दी केली होती.

परंतु चाहत्यांच्या तुडूंब गर्दीत मात्र एक विक्षिप्त प्रकार घडला आहे. त्यामुळे सगळीकडे या प्रकारामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (VIDEO) व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (backstreet Boys trolled after viral video aj mclean and kevin richardson throws underwear at audience)

अमेरिकन 'बॅकस्ट्रीट बॉईज' (Backstreet Boys) भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी मात्र ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 'डीएनए वर्ल्ड टूर'च्या निमित्तानं मुंबईच्या जीओ वर्ल्ड गार्डन (Jio World Garden) येथे त्यांच्या हा शो होता. सध्या त्यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या बॅण्डमधील गायक एजे मॅकलिन (AJ McLean)आणि केविन रिचर्डसन (Kevin Richardson) यांनी कपडे काढून आपली अंतर्वस्त्र चक्क प्रेक्षकांच्या गर्दीत फेकली आहेत. यावर काही ट्रोलर्सनी कमेंट्स केल्या आहेत. ज्यात त्यांनी म्हटलंय की (Chaddi Session) 'चड्डी सेशन'. 

हेही वाचा - ''कितीही संकट आली तरी...'', आईला कॅन्सर असल्याचं कळताच Kartik Aryan च्या कुटुंबावर संकटांचा डोंगर

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भर कार्यक्रमात त्यांनी आपली अंतर्वस्त्र (Underwear) प्रेक्षकांपुढे फेकल्यानं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. यावेळी त्यांनी स्टेजवर 'आय वॉन्ट इट डॅट वे' आणि 'डॉन्ट गो ब्रेकींग माय हार्ट' अशा काही गाण्यांचे प्रदर्शन केले होते. सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत (VIDEO) तुम्ही पाहू शकता की, प्रेक्षक हे बॅकस्ट्रीट बॉईजनं ऐकण्यात गुंग आहेत त्याचसोबत ते जोरजोरात चिअर करताना दिसत आहेत. अशावेळी मध्येच भर स्टेजवरच पडद्याआड त्यांनी कपडे काढले आणि आपली अंतर्वस्त्रे प्रेक्षकांच्या गर्दीत फेकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यापुर्वीही त्यांनी 1993 मध्ये असाच कळिसवाणा प्रकार केला होता. यावेळी त्यांच्या कॉन्सर्टला (Bollywood Celebrity at Backstreet Boys Concert) श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस, नताशा दलाल, मलायका अरोरा, अरबाज खान, बेनी दयाल, ध्वनी भानुशाली, प्रकृती आणि सुकृती काकर, मीझान जाफरी या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यांचा हा प्रकार मुंबईत घडला होता. काल दिल्लीत त्यांचा लाईव्ह शो (Live Concert) संपन्न झाला.