Babasaheb Purandare Passed Away | बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या 'त्या' आठवणीमुळे संजय राऊत भावूक

थोर इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब काळाआड 

Updated: Nov 15, 2021, 07:21 AM IST
Babasaheb Purandare Passed Away | बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या 'त्या' आठवणीमुळे संजय राऊत भावूक  title=

मुंबई : 'आमची पिढी असो किंवा आधीची पिढी असेल यांना महाराष्ट्राचा इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पोहोचवला. गेली 60 ते 70 वर्षे बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास संपूर्ण जगभरात पोहोचवला. बाबासाहेब हे मराठी जीवनाचे अंग झाले होते. बाबासाहेबांशिवाय जीवन अपूर्ण आहे. बाबासाहेबांनी शंभरी पार केली असली तरीही त्यांचा उत्साह हा तरूणांना लाजवणारा असायचा', अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

मी त्यांना जास्तीत जास्त वेळा भेटलो ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेबांचं अतुट बंद, अतूट नातं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे एकत्र बसायचे तेव्हा ती अनोखी मैफिल असायची. तेव्हासुद्धा अनेक संदर्भ समोर यायचे. या दोघांचे नाते खूप वेगळे होते, असं सांगत संजय राऊत भावूक झाले. (Babasaheb Purandare is No More : बाबासाहेब पुरंदरे कालवश, जाणून घेऊया जीवनपट) 

 

महाराष्ट्रातील गडकिल्ले शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवज, मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी 5:07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (मोठी बातमी | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन)

शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पर्वती निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तसेच 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्येकजण बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली अर्पण करत आहेत.