पोलिसांसमोर हजेरी की पोलिसांचीच हजेरी? राणे पितापुत्र यांचा नवा पवित्रा

दिशा सालियन बाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी आज दुपारी मालवणी पोल्स ठाण्यात हजेरी लावली आहे. पोलिसांसमोर ते हजेरी लावणार असले तरी ते पोलिसांचीच हजेरी घेणार असल्याचे समजते. सुमारे अडीच तासांपासून राणे पितापुत्रांची चौकशी सुरु आहे.  

Updated: Mar 5, 2022, 05:07 PM IST
पोलिसांसमोर हजेरी की पोलिसांचीच हजेरी? राणे पितापुत्र यांचा नवा पवित्रा title=

मुंबई : नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन हीच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, दोन्ही पिता पुत्रांनी 5 मार्चपर्यंत तारीख वाढवून मागितली होती.

दरम्यान नारायण राणे व नितेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात ॲड. सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी दिंडोशी न्यायालयानं या दोघांनाही 10 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. तसेच, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश दिलेत.

आज दुपारी नारायण राणे, नितेश राणे यांनी मालवणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली.  मात्र, यावेळी नारायण राणे पोलिसांचीच हजेरी घेणार असून ते पोलिसांना काही प्रश्न विचारणार आहेत. या प्रश्नांची त्यांना लेखी उत्तर अपेक्षित आहे अशी माहीती मिळतेय. .  

दिशा सालियन हिच्या मालवणी येथील घराचे 8 जून 2020 चे सीसीटीव्ही फुटेज मिळावे. 8 आणि 9 तारखेला दिशाची मोबाईल टाॅवर लोकेशन, कोणाचे फोन आले आणि तिचे कुणाला फोन गेले याची माहिती मिळावी. 

आमच्या माहितीप्रमाणे दिशाची मयत बाॅडी घराच्या कंपाऊंड बाहेरी सापडली हे संशयास्पद आहे. दिशा हिचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट आला का ? तो जाहीर का केला नाही. घटनेचा प्रत्यक्षदर्शी रोहन राय हिच्या समवेत दिशा राहत होती. त्यामुळे रोहन राय यांचे जबाब नोंदविला आहे का ? असल्यास तो सध्या कोठे आणि जबाब काय असे प्रश्न राणे यांच्याकडून विचारण्यात येणार आहेत.

दिशाचे मोबाईल लोकेशन जुहू येथील इस्काॅन मंदिर जवळ एक फ्लॅट येथे दाखवत आहे का? 8 आणि 9 जूनला दिशा राहत असलेल्या बिल्डींग  गेटवरील नोंदवही पाने फाडली का ? असेही नारायण राणे पोलिसांना विचारणार आहेत. 

दरम्यान, नितेश राणे यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यापूर्वी "खेल आपने शुरु किया है, खत्म हम करेंगे, न्याय मिलेगा." असे ट्विट केले असून त्यांचा रोख नेमका कुणाकडे याचीच चर्चा सुरु आहे.