एटीएसच्या कारवायांना वेग, 'सनातन'च्या आणखी एका साधकाची चौकशी

एटीएसने नालासोपारा स्फोटकप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. 

Updated: Aug 25, 2018, 04:30 PM IST
एटीएसच्या कारवायांना वेग, 'सनातन'च्या आणखी एका साधकाची चौकशी title=

मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकरबाबत एटीएसने सनातनच्या आणखी एका साधकाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कुलकर्णी असे त्यांचे नाव असून ते तासगाव येथील आहेत. एटीएसने केवळ चौकशी करुन त्यांना सोडून दिले. 

यावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भातील आपली भूमिका मांडली. हिंदुत्ववादी संघटनांना आणि कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरु आहे. या पत्रकार परिषदेत सुरुवातीला सचिन कुलकर्णी यांनी चौकशी झाल्याचे कबुल केले. मात्र, पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. 

तत्पूर्वी एटीएसने नालासोपारा स्फोटकप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. अविनाश पवार असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अविनाश पवारला घाटकोपरच्या भटवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली.