Election Results 2022 : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) मतमोजणीचे कल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. 5 राज्यांच्या विधानसभेपैकी तब्बल 4 राज्यात भाजप (BJP) सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे.
भाजपने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) बहुमताचा आकडा पार केला आहे. यासह मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजप सरकार स्थापन करेल. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: युपीत जाऊन प्रचार केला होता.
पण शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये खातंही खोलता आलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवारांना 0.02 टक्के म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं पडली आहेत.
निकालानंतर संजय राऊत निशाण्यावर
पाच राज्यांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर मोहित कम्बोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, संजय राऊत 'हाऊ इज द जोश'
Sanjay Raut How Is The Josh !@rautsanjay61
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 10, 2022
शिवसेनेचा बाण फुस...
उत्तर प्रदेशात निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 60 जागांवर उमेदवार उभे करू आणि 60 ही जागा 100 टक्के जिंकू असा विश्वास दाखवला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी स्वतः उत्तर प्रदेशात प्रचार केला होता.
अदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यासह थेट गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचा बालेकिल्ला आहे.