वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवार

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 

Updated: Oct 5, 2019, 09:03 PM IST
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवार title=

मुंबई : ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वरळीच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तब्बल १९ उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाने उमेदवार दिले आहेत.

७ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे. या दिवसापर्यंत कोणत्याच उमेदवाराने त्याचे अर्ज मागे घेतले नाहीत तर आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवारांचं आव्हान असेल. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वरळीतून उमेदवार देणार नाही, अशी चर्चाही सुरु होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर केला. 

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील उमेदवार 

आदित्य ठाकरे- शिवसेना 

सुरेश माने- राष्ट्रवादी काँग्रेस 

गौतम गायकवाड- वंचित बहुजन आघाडी

दिनेश महाडिक- संभाजी ब्रिगेड

विद्यासागर विद्यागर- बहुजन समाज पार्टी

अमोल निकाळजे- अपक्ष 

अंकुश कुराडे- अपक्ष

अभिजीत बिचुकले- अपक्ष 

विश्राम पदम- बहुजन समाज पार्टी

मंगल राजगोर- अपक्ष

प्रताप हवालदार- प्रहार जनशक्ती पार्टी

साधना माने- अपक्ष 

संतोष बनसोडे- भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ

विजय शिकतोडे- अपक्ष 

सचिन खरात- अपक्ष

मिलिंद कांबळे- नॅशनल पिपल्स पार्टी 

नितीन गायकवाड- अपक्ष

रुपेश तुर्भेक- अपक्ष 

उत्तम जेटीथोर- बहुजन मुक्ती पक्ष 

महेश खांडेकर- अपक्ष