मुंबई : कोरोनाचा कहर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या त्याच्या थेट परिणामांचे पडसाद भारतातही दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱी शेअर बाजाराची पडझड सोमवारीही कायम राहिली.
सोमवारी शेअर बाजार मोठ्या फरकाने कोसळला. ज्यामध्ये सेन्सेक्स २००५ अंकांनी पडला, तर निफ्टी ६११ अंकांनी आपटला. आशियाई बाजारात एकंदरच पुन्हा एकदा पडझ़ड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी गडगडले .
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
कोरोनाच्या परिणामामुळे शेअर बाजाराचा आलेख गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. दरम्यान, आज SBI कार्डचा आयपीओ बाजारात लिस्ट होणार आहे. शिवाय अमेरिकन रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपातही केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या आर्थिक उलाढालींमध्ये कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.