मुंबई : टूजी घोटाळा निकालापाठोपाठ काँग्रेस नेत्यांना आणखी एक मोठा दिलासा कोर्टाकडून मिळालाय.
आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास हायकोर्टाने स्थगिती दिलीय. या प्रकरणाचा खटला भरण्यासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली होती.
मात्र राज्यपालांचे हे आदेश हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द केले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाणांना आदर्श प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय.
२०१०मध्ये आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा उघड झाल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यांच्यावर आदर्शमध्ये आपल्या नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप झाला होता