मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करुन, त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.
पुण्याहून निघालेल्या या यात्रेमध्ये सलग सात दिवस चालल्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान मुंबईत पोहोचलेल्या राजू शेट्टींच्या प्रकृतीची मानखुर्दमध्ये डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना सलाईन लावलं. तसंच डॉक्टरांनी राजू शेट्टींना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.