आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार

महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे. 

Updated: Nov 29, 2019, 06:29 PM IST
आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार  title=

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत बोलताना ही माहिती दिली. आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 'रातोरात झालेली कत्तल मान्य नाही. आरेमधील एकही पान तोडू दिलं जाणार नाही.' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या आधी आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अनेकांचा आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध होता. तर काही जण याच्या बाजुने होती. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. मेट्रो ३ प्रकल्पाशी संबंधित चार संयुक्त याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर प्रशासनाने लगेचच रात्रीच झाडं तोडली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेने याला जोरदार विरोध केला होता. 'आरेमधील जैवविविधता संपवणं ही लज्जास्पद गोष्ट आहे.' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.