मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर, सोलापूर, परभणी, जालना, अमरावती, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यांसाठीच्या पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. तसा शासन अद्यादेश जारी करण्यात आला आहे.
राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्यांचे आदेश जारी. सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी. वेणूगोपाल; जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया यांची नियुक्ती. pic.twitter.com/gNxVPuuKaZ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 9, 2020
सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) बी.वेणूगोपाल, जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया; परभणी जिल्ह्यासाठी महसूल आणि वन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागचे सचिव किशोरराजे निंबाळकर; अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन, मुंबई उपनगरासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांची नियुक्ती.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 9, 2020
तर अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन; मुंबई उपनगरासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांचा पालक सचिव म्हणून समावेश आहे.
या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक 202002281644501307 असा आहे, अशा राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.