ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे या उद्योगपतीला करतीये डेट

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या जोरदार चर्चेत आहे. ब्रेकअपनंतर अंकिताची नवी लव्हस्टोरी सुरु झालेय.  

Updated: Jun 7, 2018, 06:22 PM IST
 ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे या उद्योगपतीला करतीये डेट title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या जोरदार चर्चेत आहे. ब्रेकअपनंतर अंकिताची नवी लव्हस्टोरी सुरु झालेय. ती एका उद्योगपतीबरोबर डेटिंग करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून वेगळी झाल्यानंतर एकटी पडलेली अंकिता आपल्या विश्वात असून तिचे नाव मुंबईतील उद्योगपतीशी जोडण्यात आलेय. सध्या दोघे अनेकांच्या दृष्टीस एकत्र पडल्याचे वृत्त हाती आलेय.   

अंकिता तिच्या लव्हलाईफमुळे पुन्हा चर्चेत आहे. ती उद्योगपतीला डेट करत असल्याची माहिती हाती आली आहे. विक्की जैन असे या उद्योगपतीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघे जवळ आल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षी होळीच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये दोघे एकत्र आले होते. आणि दोघांची जवळीकता वाढत गेली. ही जवळीकता मैत्रीच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, विक्की आणि अंकिता हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. अनेकदा एकत्र वेळ घालवतानाही दिसले आहेत. विक्की हा बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, त्यांचे २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झाले.