अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले हे आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत.

Updated: Apr 6, 2022, 10:32 PM IST
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले हे आदेश title=

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीच्या आरोपांचा तपास करण्यासाठी सीबीआयनं देशमुखांना आज ताब्यात घेऊन विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणात सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना आधीच अटक झाली असून चौघांची समोरासमोर चौकशी करायची असल्याचा CBIचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला. 

सीबीआयनं 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं त्यांना 6 दिवसांची कोठडी दिली. तसंच देशमुखांना चौकशीसाठी दिल्लीला न्यायचं असेल, तर जेजे रुग्णालयातील डॉक्टरांची परवानगी घेण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. 

दरम्यान, सीबीआयनं ताबा घेऊ नये यासाठी हायकोर्टात गेलेल्या देशमुखांना दणका बसलाय. आधी हे प्रकरण न्या. रेवती ढेरे यांच्या कोर्टात गेलं. त्यांनी सुनावणीस नकार दिला. त्यानंतर देशमुखांचे वकील अॅड अनिकेत निकम न्या. प्रकाश नाईक यांच्याकडे गेले. त्यांनीही ही याचिका ऐकण्यास नकार दिला. आता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश ही याचिका तिस-या न्यायमूर्तींच्या एकलपीठाकडे वर्ग करण्याची शक्यता असली तरी आज मात्र देशमुखांना दिलासा मिळू शकला नाही.